विश्वचषकाच्या स्पर्धेतील शेवटचा सामना हिन्दुस्थानाला विश्वविजेतेपद मिळवून देणार होता. हिंदुस्थानने प्रथम फ़लंदाजी करताना संपूर्ण ६० षटकेही खेळून न काढता ५४.४ षटकात सर्व …बाद १८३ धावा केल्या.श्रीकांतनेच काय त्या ८२ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या तर अमरनाथने २६ धावा करण्यासाठी तब्बल ८० चेंडू घेतले. पुढे संदीप पाटीलच्या २७ धावांच्या खालोखाल २० धावा ह्या अवांतर होत्या म्हणून कि काय थोडी फ़ार तरी झुंज दिसली. मात्र वेस्ट इंडीजसाठी हा सामना म्हणजे जिंकण्याची फ़क्त औपचारिकता पूर्ण करण्यासारखे होते. मात्र विड़ीजच्या ५० धावसंख्येवर कपिल देवने वि. रिचर्ड्सचा त्रिखंडात गाजलेला झेल घेतला आणि विंडीजच्या पडझडीला सुरूवात झाली आनि मग काय? मदनलालपुढे डेसमंड हेन्स,गोम्स सारखे सगळेच वीर धारातिर्थी पडले, उरलेल्या काहीजणांना अमरनाथ व संधूने गुंडाळले आणि ही पडझड थेट सर्व बाद १४० पर्यंत जावून थांबली कारण बाद व्हायला कोणी शिल्लकच राहिले नव्हते म्हणून..!
.
.
२५ जून १९८३ रोजी हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला तोही क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर…!
इंग्रजांच्याच भूमीत……
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!