फलटण :खामगाव तालुका फलटण येथील ऊस पिकातील शेतकऱ्यांना हुमनी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचायत समिती फलटण कृषी विभाग यांच्यामार्फत प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिक खामगाव येथील प्रगतशील शेतकरी दादासो महादेव बांदल यांच्या शेतात देण्यात आले
लिंब ,बाभुळ या झाडावर सुरुवातीच्या पावसानंतर हुमणीचे भुंगेरे हे मिलनासाठी रात्रीच्यावेळी जमिनीतून बाहेर येतात व त्यानंतर सकाळी पुन्हा जमिनीत जातात व मादी तिच्या जीवनकाळात किमान सत्तर ते 80 अंडी घालते व त्यातून नंतर हुमनी आळी बाहेर पडते त्यामुळे शेतातील मोकळ्या जागेत व लिंब ,बाभुळ या झाडांच्या जवळ सायंकाळी हा प्रकाश सापळा तयार करावा यासाठी सोप्या पद्धतीने पाणी साठवून यामध्ये थोडे रॉकेल किंवा कीटकनाशक टाकावे व सदर सापळ्याच्या मध्यभागी एक बल्ब (विशेषत: पिवळा) सोडाल्यामुळे हे हुमणीचे भुंगेरे प्रकाशाच्या दिशेने आकर्षिले जाऊन पाण्यामध्ये पडून मरून जातील आणि त्यांची पुढील पिढी जन्माला येणार नाही व अशाप्रकारे आपण किडीचे नैसर्गिकरीतीने नियंत्रण करू शकतो
यामध्ये संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली असता पिकावर प्रादुर्भाव सदर क्षेत्रात असलेने प्रकाश सापळा करून आवश्यकतेनुसार नंतर शेतामध्ये मेटॅरियाझीअम ही जैविक बुरशी वापरण्याचा सल्ला दिला दिनांक 18 ते 20 जून या दरम्यान हा सापळा लावण्यात आला त्यामध्ये जवळपास ०५ किलो भुंगेरे सापडले यावेळी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी दीपक महांगडे, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग ,कृषी पर्यवेक्षक बेलदार ,महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालक उमेश पवार व शेतकरी उपस्थित होते यावेळी होमनी झाल्यानंतर रासायनिक औषधांचा वापर करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तसेच सामुहिकपणे आणि उस्फुर्तपणे शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे वापरावे असे मत दीपक महांगडे यांनी व्यक्त केले यावेळी शेतकऱ्यांना मकापिकावरील नियंत्रणाबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले .