पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक शेती करण्यात बळीराजा व्यस्त

आसू – आनंद पवार
फलटण तालुक्यातील बागायती पट्ट्यात जून च्या पहिल्या आठवड्यात च दमदार  पाऊस झाला भविष्यात पावसाची अपेक्षा समोर ठेवून बळीराजा सध्या शेती कामांमध्ये व्यस्त दिसत आहे
फलटण तालुक्याचा काही भाग जिरायती पट्ट्यात मोडत होता परंतु त्या भागात पाणी आल्याने तोही भाग सुजलाम-सुफलाम झालेला पाहायला मिळतो सध्या जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार सलामी दिल्याने नीरा पट्ट्यातील शेतकरी सुखावला असून ट्रॅक्टर व बैलांच्या या माध्यमातून तो शेतीकामात व्यस्त दिसत आहे
      गेली अनेक दिवस या भागात बाजरीचे पीक पाहायला मिळाले नव्हते परंतु जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सुरुवात केल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे त्यामुळे या भागात बाजरीचे पीक जादा प्रमाणात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल मे पूर्वी नांगरट करून घेतली होती आता ऊसाला सरी सोडणे फनने आधी कामांमध्ये बळीराजा गुंतला आहे परंतु या आधुनिकतेच्या युगातही तांत्रिक शेतीबरोबरच आधुनिक व पूर्वापार शेतीलाही प्राधान्य देताना या भागात चित्र स्पष्ट होत आहे
फलटण तालुका म्हटलं की ऊस पट्टा समोर उभा राहतो परंतु बाजरी मका कडवळ भाजीपाला सूर्यफूल सोयाबीन यांची ही पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते सध्या अनेक शेतकरी बाजरी साठी आपल्या या सर्जा-राजाच्या माध्यमातून शेततयार करण्यात तो व्यस्त आहे
       फलटण पूर्वभाग हा नीरा नदी व नीरा कॅनल वरती अवलंबून आहे या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरीही कॅनाल वरतीच शेतीचे भवितव्य अवलंबून असते त्यातच यावर्षी मोठी पावसाची अपेक्षा समोर ठेवून बाजरी सारखी पिके घेण्यात शेतकरी व्यस्त आहे तसेच उसाची  लागन मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे दिसत आहेत

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!