|| पहाटेच तुळशीला पाणी का घालावे?||

|| पहाटेच तुळशीला पाणी का घालावे?||
आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला
पाणी घालावे असे सांगीतले आहे.त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत.
१) अध्यात्मिक महत्व-
याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस
असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्यानेदेवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करूनसोडलेले असते. 
       त्याला कसे रोखायचे, असा प्रश्नसर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या
पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. 
           ते जालिंदराचे रूप
धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच,
जालिंदराचा मृत्यू होतो.
          देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते.
         नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा
विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही
तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. 
        भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. 
देव दगड होऊन पडले. त्यालाच  ‘ *शालिग्राम* ’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. 
        तीच तुळस कृष्णाने व
पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘ *शालिग्राम* ’ हा जो
दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. 
        ती भगवंतांची प्रिय
होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम
करतो, अशी श्रद्धा आहे.
याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.
२) वैज्ञानीक महत्व-
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन
सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की,
सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.
        मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की
जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका
ओझोन-O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन
नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते.  
        ज्यामुळेमनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच
त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व
किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत.
कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे
सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.
या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.
llइति सर्वेश्वरीचरणार्पणमस्तु…
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, 
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि….
जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
🙏🙏💐💐 रामकृष्ण हरि माऊली सुप्रभात 🙏🙏💐💐

संकलन=
प्रा.नितीन महादेव नाळे

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

0 thoughts on “|| पहाटेच तुळशीला पाणी का घालावे?||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!