बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन हददीतील गणेश भाजी मंडई इमारत गाळा नंबर एफ एफ १०४ मधील कोणीतरी अज्ञात चोरटयांनी दुकान फोडुन त्यातील माल व रोख रक्कम चोरी करून चोरून नेलेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला ०६ मे २०२० रोजी दुकानफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याप्रमाणे गुन्हयातील गेले मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने चालू केला . बारामती शहर व शेजारील गावामध्ये शोध घेवुन एक आरोपीस ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता सदर आरोपी तुषार मारूती सोनवणे (वय १ ९ वर्षे) रा.बारामती आमराई कोअरहाऊस ता.बारामती जि.पुणे तसेच संग्राम साळुखे रा.बारामती आमराई वडकेनगर ता.बारामती जि.पुणे ( फरारी ) यांनी गुन्हे केल्याची कबूली दिली . त्यांचेकडून तपासादरम्यान २ ९ , १०० रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे .
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले , योगेश शेलार , सहा . फौजदार संदिपान माळी , पो.कॉ. पोपट नाळे , राजेश गायकवाड , सिध्देश पाटील , पोपट कोकाटे , सुहास लाटणे , अंकुश दळवी , दशरथ इंगवले , अजित राऊत , योगेश कुलकर्णी यांनी केली.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!