श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी : दत्तात्रय गुंजवटे

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यामध्ये  ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ठेवण्याचे काम  महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ  अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा मतदारसंघांमधून  निवडून जाता आलेले नाही. वास्तविक पाहता  फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असून त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो व राज्यसभा खासदार शरदचंद्रजी पवार यांनी घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती  दत्तात्रय गुंजवटे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे  केलेली आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाह घेत पक्षवाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा असेही गुंजवटे यांनी स्पष्ट केलेले आहे.
श्रीमंत संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व सर्व जिल्ह्याला माहित असून अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधानपरिषदेवर घेऊन संधी दिली तर सातारा जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांची अतिशय चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल यात कसलीही शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटिल, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी अशी मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केलेली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!