फलटण : जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल जावली मधील नवोदय परीक्षेमध्ये अमेय हरिचंद्र जाधव व शिवम धनाजी होळ या दोन विदयार्थीने घवघवीत यश संपादन केले आहे, यापूर्वीही ही सैनिक स्कुल परीक्षेमध्ये 4 विद्यार्थी व मंथन मध्ये 7 विद्यार्थीने यश मिळविले आहे.निसर्गरम्य परिसर, वैयक्तिक मार्गदर्शन अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे हे विद्यार्थी या शाळेत यश संपादन करत आहेत.या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, ग्रामस्थ, पालक, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल चवरे सर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.