सातारा दि. 21 (जिमाका): शारीरीक, मानसिक, बौध्दीक, अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी सातारा जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे सकाळी 6.30 ते 8 यावेळेत ऑनलाईन पध्दतीने झूम ॲप व फेसबुक लाईव्ह याद्वारे श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रिडा संकुल, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या योगदिनाच्या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध योग संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभाग घेतला असून यावेळी योगाचे महत्व जाणून प्रात्यक्षिके केली.
या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालय, इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग, हॅप्पी लाईफ फौंडेशन, गाथा योग साधना केंद्र,योग विद्याधाम, गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान सातारा, जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक संघ यांचे सहकार्य लाभले.