फलटण दि.21: राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये फलटण तालुक्यातील तुषार लक्ष्मणराव गुंजवटे यांची नायब तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन, सातारा जिल्हा आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन व फलटण तालुका आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
राज्यसेवा परीक्षेतून नायब तहसीलदारपदी निवड झाल्याबद्दल तुषार लक्ष्मणराव गुंजवटे यांचा महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टीचर्स असोसिएशन आणि सातारा जिल्हा बहुजन टीचर्स असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बापुराव जगताप, खुंटे केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग जाधव साहेब, कोराळे शाळेचे माजी मुख्याध्यापक रामचंद्र महांगडे,प्रकाश पवार,महाराष्ट्र आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे नेते व मिंडवस्ती ( साठेफाटा) शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मणराव गुंजवटे,बोरकरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छाया गुंजवटे, मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सिनिअर पीआय जोतिराम गुंजवटे, महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश बोराटे, सातारा जिल्हा आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गणपतराव बनसोडे, फलटण तालुका आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत तांबे, तालुका कोषाध्यक्ष विकास सोनवणे, निंबळक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शारदा निंबाळकर, मिंडवस्ती( साठेफाटा) शाळेच्या शकुंतला पवार, विश्वास अर्जुन, सुर्यकांत शिंदे, सुनील मदने, गजानन नाळे,आबासौ नाळे, संजय बडे, नामदेव गायकवाड, विठ्ठल राऊत व फलटण तालुका आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.