‘रियल हेल्थ इन योगा’ हा विचार सर्वदूर पोहचविण्याचा निर्णय
बारामती : जागतिक योगा दिन निमित्त विविध योगासने,प्राणायम करीत व योगाची माहिती देत योगा दिन साजरा केला.
योगा ची निर्मिती व धकाधकीच्या जीवनात योगाचे मानवी जीवनास होणारे फायदे त्या साठी योगासने व ध्यानधारणा महत्वाची आहे असे सांगत व योगा विषयी माहिती पुस्तके वाटून जागतिक योगा दिन डब्ल्यू टी एफ (वुई द फुवचर ग्रुप) संस्थेचे वतीने रविवार 21 जून रोजी सकाळी सात वाजता साजरा करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्ष राजेश मेहता यांनी प्रास्ताविक करून योगासने प्रात्याक्षिक सादर केली.” रोज सकाळी नीरा डावा कालवा शेजारील भरावावर चालणे,पळणे,हास्य क्लब आणि योगासने केली जातात विविध क्षेत्रातील अधिकारी,व्यवसाईक,कामगार आदी मंडळी याचा लाभ घेतात . तणावमुक्त जीवन जगण्यासाठी
डब्ल्यू टी एफ संस्था सहकार्य करते व पर्यावरण वाचवा या विषयी संदेश सर्वदूर जावा या उद्देशाने शैक्षणिक सहल आयोजित केली जाते,विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केले जाते जाते असेही राजेश मेहता यांनी सांगितले.स्वागत राजेंद्र वणवे,आभार दादासाहेब माने यांनी मानले तर चारुदत्त पेंढारकर यांनी ‘योग व भारत देश ‘ या विषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी डब्ल्यू टी एफ चे सकाळी व संध्याकाळी योगासने व व्यायाम करण्यासाठी येणारे सभासद उपस्तीत होते.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – wphaltantoday@gmail.com
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!