सातारा दि. 20( जि. मा. का ) : काल उशिरा कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे कराड तालुक्यातील चिखली येथील 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात घेण्यात आलेला नमुना कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
212 नागरिकांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 8, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 27, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 35, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 22, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 11, रायगाव येथील 26, पानमळेवाडी येथील 7, मायणी येथील 25, महाबळेश्वर येथील 9, पाटण येथील 42, अशा एकूण 212 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.