कोरोनातून बरे झालेल्या 19 जणांना आज डिस्चार्ज
आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 624
सातारा दि. 20( जि. मा. का ) : विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बऱ्या झालेल्या 19 नागरिकांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कोरोनातून बरे होवून डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये बेल एयर हॉस्पीटल पाचगणी येथून महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 36 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, दाबेकर येथील 36 वर्षीय महिला, महाबळेश्वर येथील 29 वर्षीय महिला.
कोरोना केअर सेंटर मायणी येथून खटाव तालुक्यातील म्हासूर्णे येथील 24 वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील 39 वर्षीय महिला.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून होळ ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, बोरीव ता. कोरेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, व्याजवाडी ता. वाई येथील 22 वर्षीय महिला.
कोरोना केअर सेंटर खावली (सातारा) येथून पिंपळवाडी-धावडशी येथील 15 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलगा.
कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील 28 व 40 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 42 वर्षीय महिला, केसे येथील वय 42,50 व 60 वर्षीय महिला व 20 वर्षीय युवक व 20 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.