शहीद जवानांना जय जवान सैनिक संघटना कडून श्रद्धांजली

चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आव्हान
बारामती: चिनी वस्तू खरेदी करू नका व आपल्या शहीद बांधवांचा बदला घ्या असे आव्हान जय जवान आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले.
   भारत चीन सीमेवर चिनी सैनिका बरोबर लढताना वीर मरण आलेल्या जवानांना बारामती तालुका जय जवान  आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शुक्रवार 19 जून रोजी भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला.
 गलवान घाटी लडाख मधील भारत चीन सीमेवर शहीद झालेल्या 20  शूर जवानांना  वीर मरण आले ते केवळ चिनी सैनिक यांचा धोकेबाज कावा    त्यामुळे या पुढे  चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आव्हान करून   सैनिक परिवार कोणतीही चीनी वस्तू खरेदी करणार नाही व विकणार सुध्दा नाही याची सामूहिक  शपथ       घेन्यात आली आणि चीनी वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी जय जवान आजी माजी सैनिक संघटना बारामतीचे अध्यक्ष  हनुमंतराव निंबाळकर, सचिव  राहुल भोईटे, रमेश रणमोडे,  राजेन्द्र चव्हाण, रविंद्र लडकत, दिलीप चौधरी निवृत्ती गिरमे, पांडुरंग जमदाडे, अभय थोरात, दत्तात्रय जगताप, अशोक जगताप, बाळासाहेब माळी, शिवलिंग माळी, विलास कांबळे, नामदेव जगताप, गौतम भालेराव, रोईदास यादव, चंद्रकांत चव्हाण, चंद्रकांत जोरे, मारुती कांबळे,  संतोष थोरबोले, प्रकाश चौधरी, रामचंद्र घोरपडे, भारत मोरे, विलास मोरे, नगरपालिका अधिकारी  महेश तोडकर , बाळासाहेब ढोबळे व राष्ट्रवादी अपंग सेल चे अध्यक्ष हेरंब लोणकर आदी मान्यवर उपस्तीत होते.प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत नींबाळकर  यांनी केले.
 *चिनी वस्तू वर बहिष्कार टाका* 
 व्यापाऱ्यांनी सुद्धा जास्त नफा मिळत आहे म्हणून चिनी वस्तू विकण्यास ठेऊ नये व ग्राहकांनी  कमी दरात चिनी  वस्तू    खरेदी करता येतायत म्हणून घेऊ नये . घरबसल्या आपल्या गावात  देशाबद्दल  प्रेम दाखवण्याची हीच खरी वेळ आहे नागरिकांनी लढाईने नव्हे तर चिनी वस्तूचा त्याग करून देशप्रेम दाखवा असेही माजी सैनिकांनी सांगितले.
            PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!