बारामती शहरात आमराई परिसरात सापडला कोरोना रुग्ण आमराई परिसर केला सील

बारामती: बारामती शहरातील आमराई परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला व प्रशासन जागे झाले
शहरातील अमराई येथील 29 वर्षीय महिलेचा
कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न
झाले आहे. बारामती शहरात तब्बल तीन
आठवड्यानंतर कोरोना संक्रमित रुग्ण
आढळून आला आहे. त्यामुळे
बारामतीतील कोरोना रूग्णांची संख्या
23 वर पोहोचली आहे.
      लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती
शहरात प्रथमच कोरोना रुग्ण आढळला
आहे. सदरची व्यक्तीची खाजगी
हॉस्पिटलमध्ये स्लॅब घेऊन चाचणी
घेतली असता पॉझिटीव्ह आली आहे.
त्यामुळे आमराई परिसरातील सुहासनगर
घरकुल जयभिम स्तंभ ते सिध्दार्थनगर
चौक ते सचिन काकडे किराणा दुकान ते
दामोदरे रॉकेल दुकान ते धनंजय तेलंगे ते
वसाहत चौक ते जयभिम स्तंभ
सुहासनगर घरकुल चौक ही सीमा गृहीत
धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले
आहे.
         प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा
वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी
घालण्यात येत आहे. तरी सर्व नगर
परिषद बारामती येथील नागरिकांना
आवाहन करण्यात येत आहे की आपण
आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा
घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ
नये, अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी
बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे
आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था राखण्यात सहकार्य
करावे असे आवाहन प्रांताधिकारी
दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!