विद्यार्थ्यांना होणार आधुनिक तंत्रज्ञान फायदा
बारामती:
लॉकडाउनच्या काळात महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाने कोर्सेरा (Coursera) आणि इडीएक्स (edX) या नामांकित ऑनलाईन लर्निंग कोर्सेस उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांसोबत टायअप केले होते. तसेच या कंपन्यांकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोर्सेरा कडून १५०० लायसन्स आणि इडीएक्स कडून ५००० लायसेन्स देण्यात आले आहेत, या लायसन्सेसची मार्केटव्हॅल्यू करोडोंच्या घरात आहे.
कोर्सेरा आणि इडीक्स या कंपन्यांनी त्यांच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर ७५०० पेक्षा जास्त ऍडव्हान्स कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, पायथॉन, डेटा सायन्स, ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी, डेटा अनॅलिटीक्स इत्यादीचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर वापर केला असून १५०० पेक्षा जास्त कोर्सेस पूर्ण केले आहेत. ३ महिन्याच्या कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कोर्सेस पूर्ण करण्याचा हा एक अनोखा विक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे.
जगातील टॉप युनिव्हर्सिटीज आणि कंपनीज चे (ऑक्सफर्ड, हावर्ड, केम्ब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, गूगल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट इत्यादी) अत्यंत दर्जेदार व महागडे असे हे सर्व कोर्सेस विद्यार्थ्यांना फ्री मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांकडून महाविद्यालयाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. हे कोर्सेस टॉप युनिव्हर्सिटीज मधील तज्ज्ञ शिक्षक आणि इंडस्ट्री एक्सपर्टसनी डिझाइन केले असल्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयातील शिक्षकांचे कौशल्य विकसित होण्याकरता होणार आहे.
काळानुसार शिक्षणात आणि शिकवण्याच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करून महाविद्यालयाने एक नवीन पायंडा पाडला आहे. महाविद्यालयाने येणारे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केली असून येणाऱ्या काळात अधीकाधीक विद्यार्थी अभिमुख उपक्रम राबविण्याचा मानस प्राचार्य आर एस बिचकर यांनी व्यक्त केला आहे.
महाविद्यालयाची ट्रेनिंग प्लेसमेंट टीम आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कोर्सेस करून स्वतःचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे यांनी दिली.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!