सातारा दि.18 (जिमाका) : उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयात कोरोना-19 या संसर्गजन्य आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पाळणे आवश्यक आहे. यास्तव सोमवार दि. 22 जून 2020 पासून उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय आवार नो पार्किंग झोन (NO PARKING ZONE) म्हणून घोषीत करण्यात येत आहे. संपूर्ण आवारामध्ये खाजगी वाहनास (चारचाकी, तीनचाकी, दोनचाकी) प्रवेश दिला जाणार नाही. या परिसरात येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने आपआपल्या जबाबदारीवर सुरक्षित ठिकाणी लावावीत. तहसिल कार्यालयाच्या परिसरात अनधिकृतपणे वाहन पार्किंग केल्याचे आढळून आल्यास पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहन उपविभागीय अधिकारी सातारा यांनी केले आहे.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!