शिंदेवाडी :- माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील तरुणांनी एकत्रीत येऊन वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण असमतोलावर वृक्ष लागवड करणे हा एक मार्ग आहे हे लक्षात घेऊन शिंदेवाडीतील तरूणांनी या पावसाळ्यात हजारो झाडे लावण्याचा उपक्रम हातात घेतला आहे.
तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुषभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे मात्र कोण संगोपन व लागवड करत नाही. वाढते तापमान पावसाची कमतरता पावसाची अनिश्चितता याला सर्वस्वी आपण सर्वच जबाबदार आहोत याची जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्ती किमान दरवर्षी एक तरी झाड लावले पाहिजे व त्याचे संगोपन केलं पाहिजे.
तसेच समाजाचे आपण देणे लागतो त्यामुळे समाजासाठी चांगले काम करायचे, या दृष्टीकोनातून रिलॅक्स ग्रुप शिंदेवाडी यांनी आपण समाजासाठी किंवा पर्यावरणा साठी काही तरी देने लागतो.याचीच जाणीव ठेवून माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी गावातील तुषार मोरे,शुभम मोरे,अतुल मोरे,विकी मोरे,सुरज मोरे,विकी शिंदे,महेश मोरे या युवकांनी पुढाकार घेऊन शिंदेवाडी गावात मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड करण्याचा निश्चय केला आहे.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!