सातारा दि. 17 ( जि. मा. का ) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2, मायणी मेडिकल कॉलेज येथील 2, बेल एअर हॉस्पीटल, पाचगणी येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण 11 जणांचा दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये फलटण तालुक्यातील जोरेगाव येथील 40 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील कावडी येथील 52 वर्षीय महिला
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, अर्बन सिटी धनगरवाडी 50 वर्षीय महिला
कराड तालुक्यातील केसे येथील 32 वर्षीय महिला, कार्वेनगर येथील 71 वर्षीय पुरुष व 62 वर्षीय महिला
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे दिघेवाडी येथील 47 वर्षीय महिला, घीघेवाडी येथील 48 व 25 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
181 जणांचे रिपोर्ट पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 7, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 37, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 13, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 7, शिरवळ येथील 19, रायगाव येथील 34, मायणी येथील 21, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 24 असे एकूण 181 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.