सांगवी येथे कृषी खात्यामार्फत बिज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे सादरीकरण

 सांगवी:(ता.फलटण )पेरणीपूर्वी बियाण्यास जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया केल्यामुळे पीकाची जोमदार वाढ होऊन रासायनिक खताच्या मात्रेमध्ये बचत आणि उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते असे मंडळ कृषि अधिकारी,विडणी माननीय श्री.अमोल सपकाळ यांनी सांगितले.
सांगवी गावचे प्रगतिशील शेतकरी   श्री.पोपट विठोबा गायकवाड यांच्या शेतावर उपविभागीय कृषी अधिकारी मा.श्री.प्रकाश सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी मा. श्री.सुहास रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.ते पुढे म्हणाले की कृषी विभागाच्या मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, शेतकऱ्यांची शेती शाळा,बांधावर खत व बियाणे वाटप इ.योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा.
यावेळी कृषि सहाय्यक योगेश भोंगळे यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया सोयाबीन बीज प्रक्रिया प्रत्यक्षिक उपस्थितांसमोर सादर केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना आत्मा योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या “रायझोबियम” जिवाणू संवर्धकाचे वाटप करण्यात आले.
कृषी पर्यवेक्षक श्री.राजेंद्र पालवे यांनी सोयाबीन पिकाची पेरणी व रासायनिक खताचे नियोजन यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली.
याप्रसंगी एस.पी. क्रॉप प्रोटेक्शन अॅन्ड प्लांट सोलुशन्स् चे संचालक मा.विक्रम पवार प्रगतिशील शेतकरी मनोहर जाधव,जितेंद्र जगताप,संपतराव जाधव, विजय गायकवाड सर,प्रमोद तावरे, ज्ञानेश्वर तावरे,दादासो तावरे आदि उपस्थित होते.
करण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

PHALTAN TODAY
                        बातमी व्यवस्था बदलणारी
            आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी
                        संपर्क-
        Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!