जागर पर्यावरण संवर्धनाचा

जागर पर्यावरण संवर्धनाचा

संपूर्ण जगामध्ये 5 जून 1974 रोजी निश्चितठरले की हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून संपूर्ण विश्वामध्ये संपन्न होईल या वर्षीचा पर्यावरण दिन नुकताच जगामध्ये कोरणारुपी महामारीमुळे उगवलेल्या महासंकटाचा मुकाबलामध्ये आपण सर्वांनीघरांमध्येराहूअथवा स्वतःच्या शेतामध्ये आगेर बांधावरती किंवामोकळ्या परिसरामध्ये बऱ्याच जणांनी झाडे लावून साजरा केला जर कराल निसर्गाचे रक्षण तरच होईल स्वसंरक्षण असं म्हटलं जातं .तर तुकाराम महाराजांनीसुद्धाम्हणलेला आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्राचीन काळी संपूर्ण पृथ्वीतलावरतीजवळजवळ 70 टक्के भाग हा वनस्पती म्हणजेच जंगलांनी व्यापलेला होता व त्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण आपोआप होत व प्राचीन कथांमध्ये हे आपणाला असं दिसून येतं की अभयारण्य आणि त्याच्यातून जावे लागणाऱ्या लोकांच्या गोष्टी दरोडेखोर हिंस्र प्राणी पशु संपत्ती निसर्ग संपत्ती निसर्गाकडून मानवाला भरभरून मिळत होतं परंतु अलीकडच्या काळामध्येमानवाने वाढत्या लोकसंख्येला अनुसरून निसर्गावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण वसुंधरेचेसंरक्षक-कवच असणाऱ्या हिरवा शालू वनस्पती या हळूहळू नष्ट करू लागला आणि त्यामुळेच आज पृथ्वीतलावर ती प्रचंड उलथापालथ सुरू झाली आहे मानवाला किमान एका दिवसांमध्ये 63 हजार वेळा पेक्षा जास्त श्वासोच्छवासकरण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते व हाऑक्सिजन आपणाला देण्याचे कार्य ह्या हिरव्या वनस्पती करत असतात अगदी असंही म्हटलं जातं की पाळण्यापासून जाण्यापर्यंत वृक्ष आमचे सगेसोयरे आहेत पूर्वीच्या काळी आणि आजही बाळ जन्माला येतच आहे परंतु जरा आठवून पहा पुर्वीच्या काळी जर बाळ जन्माला आलं व आजही जर बाळ जन्माला आले तर मामा पाळणा आणतो पण पूर्वीच्या काळी मामा जो पाळणा आणायचा तो लाकडापासून बनवलेला असायचं आजही मामा पाळणा आणतोच भाच्यासाठी किंवा भाचीसाठी परंतु तो लोखंडी किंवा स्टील धातूचा असतो मात्र व्यक्ती गेल्यानंतर आज ग्रामीण भागामध्ये पारंपारिक पद्धतीने त्याचं अंत्यसंस्कार होतात मात्र शहरी भागांचा जर विचार केला मुंबई-पुण्यासारख्या महाकाय नगरांचाविचार केला तर व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे विद्युतदाहिनी वरती करण्याचे सुरू झाले आहे भविष्यामध्ये आपणाला अजूनही विघातक अशा परिणामांना सामोरे जावे लागणार आहे म्हणूनच प्रत्येकानं झाडांचे वनस्पतींचे महत्त्व आणि त्याची देखभाल लागवड करणे ही काळाची गरज आहे 12 भूगोल विषयाचा अभ्यासक व प्राध्यापक म्हणून या निसर्गाने आणि पृथ्वी महिना आपणाला भरभरुन दिलेला आहे अजून पुढे मी झाडांचं वनस्पतींचा आपल्या आयुष्यातील महत्त्व मांडू इच्छितो व खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षण हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

 

प्रा.नितीन महादेव नाळे एम.ए.एम.एस्सी जिओग्राफी, एम ए मराठी , एम ए अर्थशास्त्र बीएड डीएसएम (प्रसिद्ध व्याख्याते कवी निवेदक निबंध लेखक) भ्रमणध्वनी :- 9404247076
 भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
🌳मित्रांनो आज पासुन आपण शपथ घेऊया कि प्रत्येकाने 1 किंवा 2 झाड लावायलाच पाहीजेत.
एक किंवा दोन झाडे लावा आणि *” निसर्ग मित्र व्हा “*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!