फलटण प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड व नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला तसेच मराठा समाजाच्या माता भगिनींना सोशल मीडियावर अपशब्द वापरून असे मेसेज व व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तर देऊ अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चचे वतीने प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली आहेत.
पिंपरी चिंचवड व नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर
मराठा समाजाच्या माता भगिनींच्या बाबत घाणेरडे मेसेज व व्हिडीओ दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनी टाकले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ मेसेज तात्काळ काढून टाकण्यात यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चचे वतीने करण्यात आली आहे. दरम्यान काही लोक दोन्ही समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यांना पोलिसांनी कायदेशीर समज द्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडलेस शासन जबाबदार राहील वरील दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. त्या बाबत झालेल्या घटनेचा व समाजाचा संबंध नाही तो वयक्तिक वादातून घटना घडली का इतर कारणाने घडली या बाबत पोलिस तपास करीत आहेत.
आपल्या देशात लोकशाही आहे तथापि न्याय व्यवस्था आपलं काम करीत आहे. या दोन्ही गोष्टींचा पोलिस प्रशासन तपास करीत आहे. आमचा पोलिस प्रशासन व न्याय देवता या दोन्ही गोष्टींवर विश्वास आहे.मात्र मराठा समाजाला टार्गेट करून काही समाजकंटक समाज व आमच्या महिला भगिनींना अपशब्द वापरत सोशल मीडियावर हे मेसेज व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करीत आहेत. अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन या समाजकंटकांचा बंदोबस्त करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चचे वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. वेळीच राज्य सरकार व गृह विभागाने अशा पोस्ट शेअर करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी शिवाजी जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना देण्यात आली आहेत.
पाहत राहा फक्त
एक पाऊल पुढे
PHALTAN TODAY आमच्या सोबत…
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!