लोंझा किल्ला
लोंझा हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १६०० फूट असून किल्ल्याची चढण सोपी गणली जाते. हा किल्ला अजंठा सातमाळ डोंगर रांगेत महादेव टाक नावाच्या डोंगरावर आहे.
खाजगी वाहनाने चाळीसगावहून अंतूर व लोंझा हे दोनही किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
महादेव टाक नावाच्या डोंगरावर असल्याने या किल्ल्याला महादेव टाक किल्ला म्हणूनही ओळखले जाते.