औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यातील एक डोंगरी किल्ला :-वेताळगड

वेताळगड
वेताळगड हा महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालूक्यातील एक डोंगरी किल्ला आहे. सोयगाव तालूक्यातील डोंगररांगात विविध लेण्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातीलसोयगाव तालूक्यापासून अंभई हळदाघाट हळदागाव मार्गे गेल्यावर चार किलोमिटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बर्‍यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद बारादरी आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात.
वेताळवाडी किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असले तरी तिथे आवश्यक अशा कोणत्याही सुविधा नाहीत. पर्यटकांना आपापल्या जवाबदारीवर किल्ल्यावर जावे लागते. एक जूनी तोफही इथे आढळते. आता तिल्या नव्याने किल्ल्यावर आणून ठेवलेले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!