राहुल पवार –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे याच परस्थिती कुरवली ता.इंदापूर या ठिकाणी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान, शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य, भारतीय जैन संघटना, पुणे जिल्हा लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन व कुरवली ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कुरवली याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरवली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून एक वेगळा उपक्रम राबवला आहे या रक्तदान शिबिरामध्ये १५१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
आयोजित रक्तदान शिबिरात १५१ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला व रक्तदान केलं रक्त दान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांस रक्तदान शिबिर आयोजकांकडून पाण्याच्या जार देण्यात आला यावेळी कुरवली गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी,डॉक्टर ,आशा आरोग्य सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.