बारामती डेपो सुरू करणार छोटे मार्गे सेवा
(दि. १५) पासून सहा मार्गांवर
बससेवा सुरू केली जात असल्याची
माहिती आगारप्रमुख अनिल गोंजारी
यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
लॉकडाऊनमुळे गेल्या तीन
बारामती-
महिन्यांपासून उभी असलेली लालापरीची
चाके यामुळे फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर,बारामती-जेजुरी, बारामती-निरा,
बारामती-भिगवण,बारामती-वालचंदनगर,
बारामती-एमआयडीसी याठिकाणी या बस मर्यादित प्रवाशांना घेऊन
प्रवास करणार आहेत. यामुळे प्रवाशांना
दिलासा मिळाला असून अनेकांचा
कामावर येण्याचा मार्ग मोकळा झाला
आहे. गेल्या तीन महिन्यांपासून
बारामती आगाराच्या एसटी बस बंद
असल्याने आगाराला करोडो रुपयांचा
फटका बसला आहे. कोरोनासंबंधी
सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन
करून या बस सुरू करण्यात येणार
असून प्रवाशांनीही सूचनांचे पालन
करावे, असे आवाहन अमोल गोंजारी
यांनी केले आहे.
सोमवारपासून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक
हडपसर – सकाळी ६, ७, दुपारी २ व ३ वाजता.
जेजुरी – सकाळी ८, ११, दुपारी २ व सायंकाळी ५ वा.
निरा – सकाळी ७, १०, दुपारी २ व सायंकाळी ५ वा.
भिगवण – सकाळी ७, ९, ११, दुपारी १, २, ४ व सायंकाळी ६ वाजता
वालचंदनगर – सकाळी ७,९.३०, ११.३०, दुपारी २,४व सायंकाळी ६ वाजता
एमआयडीसी – सकाळी ८, ९, १०, ११, दुपारी १, २, ३, ४ वाजता.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!