फलटण – सोशल मीडियावर आपल्या अकाऊंट वरून अश्लील व घाणेरडे मेसेज पाठवल्याच्या संशयावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण करून डांबून ठेवलेची घटना फलटण येथे घडली आहे.
या बाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रतीक राजेंद्र करपे रा.कारेगांव ता.कोरेगांव याचे इन्स्टाग्रामवर अश्लील व घाणेरडे मेसेज टाकल्याचा संशय घेऊन अनिल धनाजी बनकर वय -२७ रा.ढवळ ता. फलटण या तरुणाला फलटण येथील एका बँकेतून बाहेर बोलावून गाडीतून शहरातील विमानतळ येथे चौघांनी नेहून बेदम मारहाण केली तसेच त्याला अर्धा तास डांबून ठेवले या कारणावरून संशयित आरोपी प्रतीक राजेंद्र करपे रा.कारेगांव ता.कोरेगांव, सतीश मुरलीधर शिर्के रा.बोबडेवाडी ता.कोरेगांव, केदार श्रीनिवास खराडे रा.ताकोरेगांव ता.कोरेगांव, संदेश सुरेश करपे रा.बोरजाईवाडी ता.कोरेगांव यांच्यावर फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिस निरीक्षक प्रताप पोमन यांनी सांगितले की, चार व्यक्ती हे विमानतळावर एका इसमाला मारहाण करीत आहेत अशी खबर मिळाल्यानंतर पिसीआर मोबाइल ला माहिती मिळाल्यानंतर पो.उ.नि. बनकर, पो.हवा.दत्ता नाळे, नितीन भोसले, पो.हवा.मदने यांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले व चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला यानंतर गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.विक्रांत लावंड करीत आहेत