आसू/राहुल पवार – फलटण तालुक्यातील पूर्व भागातील टाकळवाडा नजीक असणाऱ्या नाझीरकर वस्तीवर ऊसाच्या शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा कुत्र्यावर हल्ला करताना येथील एका शेतकऱ्यांने पाहिल्याने याभागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबत वन विभागाने ही स्पुष्टी दिली असुन वनविभागाने त्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला असुन परीसरात भीतीचे वातावरण आहे
फुले वस्ती टाकळवाडा ता.फलटण येथे बिबट्या सदृश प्राण्यांने हल्ला केल्याने एका शेतकऱ्याच्या गाईचा मृत्यू झाला होता यानंतर मंगळवार दि.2 जून रोजी बिबट्या सदृश प्राण्यांने कुत्र्याचा फडशा पाडल्याने एकच खळबळ माजली होती या घटनेने टाकळवाडा व निंबळक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या नंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून त्या प्राण्यांचा शोधाशोध केला मात्र त्याचा तपास लागला नाही. वन विभागाकडून याठिकाणी आढळलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्यांचे ठसे घेऊनही हे ठशे कशाचे आहेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती वन विभागाकडून आजपर्यंत दिली गेली नव्हती.
सोमवार दि ८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टाकळवाडे गावातील नाझीरकर वस्तीवर राहण्यास असणाऱ्या किरण नाझीरकर यांच्या घरानजीक असलेल्या ऊसामध्ये कुत्रा भूकत होता हे पाहण्यासाठी नाझीरकर गेले असता ऊसाच्या बाहेर साधारण 20 फूट अंतरावर भूकत उभे असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवत कुत्र्याला ऊसात ओढत नेले. किरण नाझीरकर त्यांनी घडलेला प्रकार पाहिल्यानंतर या घटनेबाबत वन विभागास माहिती दिली. वन विभागाने यानंतर घटनास्थळी भेट देऊन ५०० मिटर वर सापळा लावला असून या भागात होत असलेल्या हाल्याच्या घटना पाहता वनविभागाने दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
या भागात बिबट्या चा वावर असताना तसेच शेतकरी व नागरिकांनी तक्रारी करूनही वन विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री उठावे लागते आता बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडणेही अडचणीे ठरत आहे. वन विभागाने पिंजऱ्याची व ट्रॅप कॅमेऱ्याची संख्या वाढवून बिबट्याला पकडावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.