फलटण – उसाच्या शेतात पाणी सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाल्याने पाटबंधारे विभागातील पाटकरी रमेश आप्पासो पवार यास तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एन.एल.मोरे यांनी आज (बुधवार) सुनावली आहे. संबंधित आरोपीने दंड न दिलेस तीन महिने सक्तमजुरी तसेच कलम 13 (1) (ड) सह 13 (2) अन्वये चार वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न दिलेस तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.
सन 20 मे 2015 मध्ये तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांचे मुंजवडी गट 92-1 येथील ऊस शेतीस पाणी देण्यासाठी रमेश आप्पासो पवार (पाटकरी) पाटबंधारे नीरा उजवा कालवा फलटण यांनी दोन हजार रुपयांची लाच मागणी करुन ती लाच रक्कम त्याच दिवशी 20 मे 2015 रोजी स्वतः स्विकारल्यानंतर त्यास रंगेहात पकडण्यात आले होते.