फलटण मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व राजे गट यांच्यामार्फत गरजू व गरिबांना मोफत जेवण

 फलटण : *अखंडित अन्नदान : १९ वा दिवस…बुधवार, दिनांक १०/०६/२०२०* रोजी शंकर मार्केट, फलटण येथे “कोरोना व्हायरस” मुळे लॉकडाऊन काळात गोर गरीब, बेघर, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे लोकांना पोटाला पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राजे गट) आणि शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ (मंडई गणपती) यांचे संयुक्त विद्यमाने अखंडितपणे अन्नदान मोहीम सुरु आहे.
         आजचे अन्नदान वाटप मा.श्री.दर्शन सुधाकर डेंगे व मा.सौ.रेश्माताई दर्शन डेंगे, समर्थ महिला बचत गट प्रतिनिधी, भैरोबा गल्ली येथील महिला वर्ग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
         यावेळी नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर ,(भैया), नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या शुभहस्ते अन्नदाते मा.श्री.दर्शन सुधाकर डेंगे व मा.सौ.रेश्माताई दर्शन डेंगे यांचा पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
         यावेळी गरजूंनी या अन्नछत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी केले. 
         यावेळी समर्थ महिला बचत गट प्रतिनिधी, भैरोबा गल्ली येथील महिला वर्ग, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी तसेच मित्र मंडळी उपस्थित होते. 
     आजचे अन्नदाता : मा.श्री.दर्शन सुधाकर डेंगे, विकास अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सातारा.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!