सातारा दि. 11 ( जि. मा. का ) : राज्यातील कोविड-19 च्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन दि. 30 जूनपर्यत वाढविण्यात आला असून, विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्र सोशल डिस्टन्स तसेच कोराना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणीस बांधील राहून सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी केले आहेत.
सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रामध्ये घ्यावयाची खबरदारी –
· सर्व सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रातील सामग्री व उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
· सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रातील केंद्र चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उदा. वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी.
· सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर नाक, तोंड व डोळयांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतील.
· सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रातील ऑपरेटर व येणाऱ्या नागरिकांनी पुर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढण्याच्या वेळेस मास्क काढण्यास परवानगी देण्यात यावी.
· सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे.
· सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्र व्यवस्थापक टेबल व ऑपरेटर स्थानकांदरम्यान शारीरिक अंतर (किमान 1 मीटर) सुनिश्चित करायचे आहे. जास्त गर्दी टाळण्यासाठी सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जाऊ नये.
· नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे.
· नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप, कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादीसारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत.
· प्रत्येक सेतू केंद्र व महा ई सेवा नोंदणी केंद्र युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसार नागरिकांसाठी पत्रक दर्शनी भागात लावावेत.
· सतू केंद्र व महा ई सवो केंद्रावरील ऑपरेटरनी कोविड-19 च्या हॉस्पॉटला जाणे व अशा भागातून प्रवास करण्यास सक्त मनाई राहील.
· प्रतिबंधित क्षेत्र या मधील गावे/ भागात सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्र चालू करण्यात येऊ नयेत.
· जिल्हयामध्ये सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रात शिबीर घेऊ नयेत.
· सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्याची दैनंदिन नोंद ठेवावी.
वरील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निर्दशनास आल्यास आपणावर उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ओदशात नमुद केले आहे.