माझा देव बळीराजा
माय बाप माझा शेतकरी,
राबतो आहे रानामंधी,
घाव घाली फळबागांवरी,
डोळ्यात पाणी त्याच्या खोलवरी.
पण घेतलं नाही उरावरी,
उभं पिक दान केलं कोरोनापरी,
मन तुझं सदैव आभाळावाणी,
किती गाऊ तुझी गोड गाणी.
बळीराजा तूच खरा जगाचा पोशिंदा,
हे दाखवून दिलेस तू अनेकदा ,
कर्ज अफाट आहे तुझ्या डोईवरी,
याची चिंता आहे का ?कोणालातरी .
सारं जग आता थाबलं आहे
तुझं काबाडकष्ट मात्र चालू आहे
खूप उन,वारे झेललेस आयुष्यात,
तरी देशासाठी लढतोस दिमाखात,
शेतमालाचा भाव नका करु कवडीमोल
त्याचं जगणं देशासाठी आहे अनमोल
पोटासाठी देत आहेस तूच पोटभर घास,
बळीराजा तूचआमच्यासाठी आहेस खास.
*नवकवी – सिंधूसूत*…🖋️
श्री गणेश सिंधूबाई भगवान तांबे
श्री गणेश सिंधूबाई भगवान तांबे…… उपशिक्षक
जि. प.प्राथ.शाळा कारंडेवस्ती( मलवडी) केंद्र -बिबी ता- फलटण जि- सातारा
खूपच छान काव्य रचना…
छान वास्तव्य दर्शन शेतकरी