कुरवली – कुरवली गावातील आरोग्य उपकेंद्रात गेली 25 वर्ष कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका माने मॅडम या 30 मे रोजी सेवानिवृत्त झाल्या त्याबद्दल पुरवले ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सन्मान करून त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कुरवली ग्रामस्थांनी आभार मानले.
कुरवली गावातील आरोग्य उपकेंद्रा मध्ये माने मॅडम यांनी अतिशय जबाबदारपणे येणाऱ्या सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी दिलेल्या याच सेवेबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञात व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन कुरवली गावातील मारुतीमंदिर या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी कुरवली ता.इंदापूर ग्रामपंचायत सरपंच शोभाताई बापूराव पांढरे,ग्रा.सदस्य सारिका फडतरे,ताराबाई माने,सुभद्राबाई चव्हाण,अंकुश चव्हाण,ग्रामविकास अधिकारी ए. एम.साळुंखे,योगेश माने तालुका उपाध्यक्ष तसेच आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.