फलटण :- दुधेबावी येथील दुधेबावी गावातील ह.भ.प हरिभाऊ भिकाजी एकळ यांच्या मदतीने गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून ह.भ.प हरिभाऊ भिकाजी एकळ यांनी चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ‘लॉकडाऊन’ मुळे हातावर पोट असलेल्या मजूर, रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत दुधेबावी येथील गरजू कुटुंबांना ह.भ.प हरिभाऊ भिकाजी एकळ यांनी मदतीचा हात दिला आहे. एकळ यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे.गावातील हातावर पोट असणा-या, मोलमजुरी महिला भगिनी व गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘सोशल डिस्टन्स’ पाळून करण्यात आले दुधेबावी गावातील गोरगरिबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी गावचे पोलिस पाटील सरपंच व तिरकवाडी गावचे सरपंच व बाळू एकळ तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो :- गरजूंना मदत करताना ह.भ.प हरिभाऊ भिकाजी एकळ व ईतर मान्यवर