नाभिक समाजाकडून आर्थिक मदत मिळण्या बाबतचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर

फलटण- लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यत नाभिक व्यवसायिकांची सर्व सलून दुकान बंद असल्याने नाभिक व्यवसायिकांची उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने सलुन व्यवसाय सुरु करणेची परवानगी द्यावी किंवा सलुन व्यवसायिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी असे महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा यांच्या वतीने फलटण येथिल प्रांतधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जवळपास ७४दिवस झाले नाभिक समाज बांधवाची सर्व सलून दुकान बंद असल्याने नाभिक व्यवसायिकांची उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने सलुन व्यवसाय सुरु करणेची परवानगी द्यावी किंवा सलुन व्यवसायिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा यांच्या वतीने फलटण येथिल प्रांतधिकारी डॉ.शिवाजी जगताप यांना निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊन मध्ये टप्या टप्याने अनेक व्यवसायिकांना दुकाने सुरु करणेस सुट देण्यात आली असून नाभिक समाजाच्या सलुन व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह सुरु असल्याने व्यवसाय बंद असल्याने कुंटुबावर उपासमारीची वेळ आली आहे.
सलून कारागीर व भरपाई मदत शासनाने तातडीने द्यावी.दुकान भाडे,लाईट बील, घरभाडे माफ करावे,व्यवसायासाठी काढलेले कर्जा बाबत सवलत मिळावी, व्यवसायिक याना दर माहा १० हजार रुपये तातडीने मदत मिळावी शासनाने आरोग्य कर्मचारी, आशा, पोलिस,पञकार आदींना विमा संरक्षण दिले गेले त्याप्रमाणे विमा संरक्षण सलुन व्यवसायिकांना मिळावे आदी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले असून या अगोदर पण अनेकदा नाभिक समाजाच्या सलुन व्यवसायाबाबत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शासनाला देण्यात आले आहे.आज स्मरण पञ परत नाभिक महामंडळ यांच्या कडून शासनाला देण्यात आले असून याची शासनाने त्वरीत दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.
फोटो :- महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे ज्येष्ठ नेते बापूराव काशीद महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अंबादास दळवी सर फलटण शहराध्यक्ष आनंदराव कार्याध्यक्ष बाळासाहेब काशीद फलटण शहर खजिनदार जयदीप राऊत
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!