पंचवीस जणांना आज सोडले घरी 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह; 129 जणांच्या स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

सातारा दि. 9 ( जि. मा. का ) :  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधासारण रुग्णालय, सातारा येथील 1,  सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथील 6, मायणी मेडीकल कॉलेज येथील 10, कोरोना केअर सेंटर, खावली येथील 7 व रायगांव येथील 1 असे एकूण 25 रुग्णांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील खराडे येथील 20 वर्षीय व 42 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष.
कोरगाव तालुक्यातील कटापूर येथील 28 वर्षीय पुरुष, शिरंबे येथील 27 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील आकुशी येथील 58 वर्षीय पुरुष, परतवडी येथील 29 वर्षीय महिला व 50 वर्षीय महिला,.
जावली तालुक्यातील कळकोशी येथील 49 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील वांझोळी येथील 18 वर्षीय व 54 पुरुष, 19,39,45 वर्षीय महिला. बनपुरी येथील 36 वर्षीय व 30 महिला, 13 वर्षीय युवक, 36 वर्षीय पुरुष व 15 वर्षीय युवक, चिंचणी येथील 21 वर्षीय युवक.
सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथील 58 वर्षीय  पुरुष, निगुड माळ येथील 43 वर्षीय महिला व 21 वर्षीय 52 वर्षीय पुरुष् व  रायगाव पोखरी येथील 50 वर्षीय पुरुष.
21 जणांचे अहवाल निगेटिव्ह
कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शलयचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 
129 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी
            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9,  पानमळेवाडी येथील 7, शिरवळ येथील 19, कराड येथील 5, कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 22, वाई येथील 9, रायगांव येथील 7, मायणी येथील 33, बेल एअर पाचगणी येथील 1, पाटण येथील 9 व दहिवडी येथील 8 असे एकूण 129 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  एन.सी. सी. एस. पुणे व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!