राष्ट्रवादी च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापन दिनानिमित्त
साईधाम प्रतिष्ठान बारामती यांच्यातर्फे बारामतीत नगरपालिकेचे सफाई कामगार यांना फळ वाटप व सॅनिटायझर वाटप करण्यात आले आहे
या कार्यक्रमाला नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुभाष नारखेडे ,आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्तीत होते. नगरपालिकेच्या सर्व 300 च्यावर सफाई कामगारांना वाटप करण्यात आले कोरोनाच्या संदर्भात लॉक डाऊन च्या काळात खूप परिश्रम घेतले याची जाणीव म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून बारामतीतील महिलांसाठी काम करणाऱ्या साईधाम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संगीता सूर्यकांत घाडगे व सचिव सूर्यकांत घाडगे आदी च्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस चा वर्धापन दिन व लॉक डाऊन च्या काळात उत्कृष्ट कार्य करणारे कोरोना योद्धे म्हणजे आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान फळे व सॅनिटायझर देऊन करत असल्याचे संगीता घाडगे यांनी सांगितले.