शाळा सुरू झाल्यास आपल्या मुलांना सर्वात जास्त धोका आहे
फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही तरी तोडगा काढून शाळा सुरू व्याहव्यात अशी अपेक्षा प्रत्येकाची आहे. त्या साठी वेगवेगळे पर्याय दिले जात आहे. जून महिन्यात शाळा सुरू नियमित पणे सुरू व्याहव्यात आपल्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे प्रत्येक पालकांस वाटते,तर शाळा सुरू होऊन कोणाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे शासनास,व शिक्षक वर्गास वाटत आहे पण वाचकहो जर शाळा सुरू झाल्या तर कोरोनाचे धोखे अधिक आहेत. तरीही शासन अनेक ‘नामवंता ‘ बरोबर चर्चा करून शाळा सुरू करण्याचा घाट रचत आहे त्यामुळे शासनानी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी
१५ जुन नंतर होणार शाळा सुरु. करण्याचे काम व अभ्यास चालू आहे म्हणून खालील पैकी ऐका जरी प्रश्नाचे उत्तर देता आले तर नक्की शाळा सुरू करा
१) कोरोणावर खात्रीशिर औषध सापडले आहे का ?
२) लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का ?
३) प्रत्येक बेंचवर ऐक विद्यार्धी बसवाल…पण सध्या ऐका बेंचवर तीन तीन विदयार्थी दाटीवाटीने बसविले जातात..त्या पटसंख्येच्या मानाने..जास्त बेंच व खोल्या लागतील…त्या कशा उपलब्ध करणार ?
४) शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार ?
५) मधल्या सुट्टीत टाँयलेट मध्ये गर्दी होते त्याचे नियोजन काय ?
६) जिथे शहाणे माणसे ऐकत नाहीत…तीथे लहान मुले ऐकतील का ?
७) मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय सांगता येते…लहान मुले सांगु शकतील का ?
८) सर्व व्यवस्थित आहे हे दाखविन्या साठी या साठी शाळा सुरू करायच्या आहेत का ?
९) या तीन महिन्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळुन पाहीलेले आहे…तरी ते शाळेत पाठवतील का ?
१०) प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का ?
११) पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?
१२) शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील का हात झटकुन जबाबदारी टाळतील ?
१३) मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा.. लोक सभा व विधान सभा चालु करुन कोरोणा संसर्ग वाढतो कि नाही हे पाहणे जास्त योग्य राजकीय टोलेबाजी नाही का ?
१४) स्कुल बस..रिक्षावाले मुलांची ने आण करताना नियम पाळतील ?
१५) उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला virus ची लागण झाली तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना quartine करावे लागेल. शिक्षकांना हि करावे लागेल त्याचे काय करायचे ?
१६) quartine करीता आपल्या मुलाला /मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल?
१७) बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा दोन अपत्ये आहेत ,जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार ?
१८) शिक्षण महत्त्वाचे की मुले? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे?
१९) प्रयोग करुन पहायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का ?
वरील प्रश्नचे उत्तर ज्यांना शाळा सुरू करण्याची घाई आहे त्यांनी द्यावी असा सवाल प्रत्येक पालक आता शासनास विचारत आहे व शासनाने शाळा सुरू करण्या बाबत घाई करू नये असेही पालक वर्गा मधून बोलले जात आहे.