कोरोना विरोधात लढा,दैनंदिन कार्य व वृषसवर्धन
बारामती: लॉकडाऊन च्या काळात जीवनावश्यक कंपन्यांना सेवा देणे,कोरोना विरोधात कार्य व एमआयडीसी कार्यालय व परिसरातील पर्यावरण संवर्धन करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती कार्यालयाने कोरोना योद्धा सारखे कार्य केले आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यावर बारामती एमआयडीसी मधील जीवनावश्यक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांना नियमित सेवा देत व नागरिकांना कोरोना विषयक सेवा देणे उरलेल्या वेळे मध्ये एमआयडीसी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अतिथीगृह,कार्यालय समोरील उद्यान,कांरंजे,पेन्सील चौक ते कटफळ ,गोजुबावी, गाडीखेल व कर्मचारी अधिकारी वसाहत , व एमआयडीसी हद्दीतील रस्त्याच्या कडेची झाडे,रस्ता विभाजक मधील झाडे,आदी ठिकाणे नवीन 4 ते 5 फूट उंचीचे नवीन झाडे लावण्यात आली त्यांना ट्री गार्ड, खते,पाणी देण्यात आली तर ज्या ठिकाणी जुनी झाडे होती त्या ठिकाणी डागडुजी करून त्या झाडांना व्यवस्थित आधार देत उभे करण्यात आली.जवळपास 3700 झाडांना जीवदान देण्यात आले. कार्यालय समोर नवीन लॉन्स ची निर्मिती करून लोट्स (कमळ) उद्यान तयार करण्यात आले. एप्रिल,मे महिन्यात प्रचंड ऊन असतानाही झाडे जगवली आहेत.
एमआयडीसी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कार्यात झाडाचे संवर्धन करण्यास वेळ भेटत नाही परंतु लॉक डाऊन च्या काळात उरलेल्या वेळेचा सदुपयोग करून सदर एमआयडीसी च्या सौन्दर्यात भर टाकली आहे. बारामती कार्यालय चे कार्यकारी अभियंता एस आर जोशी,उपअभियंता स्वप्नील पाटील,कनिष्ठ अभियंता भूषण ठाणगे च्या मार्गदर्शना खाली कर्मचाऱ्यांनी वृषारोपण,वृक्षसंवर्धन,उद्यान निर्मिती आदी कार्य करून पर्यावरण बाबत जागरूकता निर्माण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती एमआयडीसी च्या दौऱ्यावर असताना या हिरवाई चे कौतुक केले आहे.
*चौकट*
एमआयडीसी कार्यालय म्हणजे ‘कोरोना योद्धे चे कार्यालय’ होय .: स्वप्नील पाटील
24 मार्च पासून देशात लॉक डाऊन सुरू झाल्या पासून अधिकारी व कर्मचारी एमआयडीसी हद्दीत जंतुनाशक फवारणी,जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणे,परप्रांतातील मजुरांची सर्व माहिती प्रांत कार्यालयास देऊन मजुरांना पर राज्यात पाठविण्यास सहकार्य केले,औद्योगिक क्षेत्रातील तपशीलवार माहिती गोळा करून अधिकाऱ्यांना देणे व पर्यावरण संवर्धन कडक उन्हात करणे हे सर्व कामे लॉकडाऊन मध्ये कार्यकारी अभियंता संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित केले आहे नागरिकांसाठी व मजुरांसाठी एमआयडीसी कार्यालय ‘कोरोना योद्धे ‘ सारखे उपयोगी पडले अशी माहिती उपअभियंता स्वप्नील पाटील यांनी सांगितले.
फोटो : बारामती एमआयडीसी कार्यालय समोर लॉकडाऊन मध्ये फुलवलेले उद्यान (छाया अनिल सावळेपाटील)