सातारा दि. 9 (जिमाका) : काल बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथील आठ व श्रीमती सुशिला देवी साळुंखे गर्ल्स हॉस्टेल, पाटण येथील चार असे एकूण बारा जणांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या खंडाळा तालुक्यातील भादवडे येथील 72 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून संशयित म्हणून नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
काल उशिरा डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 49 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, नवारस्ता येथील 46 वर्षीय महिला व घनबी येथील 62 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील किरोंडे येथील 25 वर्षीय पुरुष, आसले येथील 26 वर्षीय महिला व 3 वर्ष 5 महिन्याची बालीका, कोंडावले येथील 47 वर्षीय पुरुष, धर्मापुरी येथील 23 वर्षीय पुरुष, जांभळी येथील 32 व 31 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा खंडाळा तालुक्यातील भादवडे या गावातील 72 वर्षीय पुरुषाचा सारी या आजाराच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशियत म्हणून त्यांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या रुग्णाला चार वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता त्यावर ते उपचार घेत होते.
काल रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 131 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.