फलटण – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना फिरुन भाजीपाला विक्री करण्याचे निर्देश नगरपालिकेने दिलेले आहेत. परंतु अशक्त व वयोवृद्ध विक्रेत्यांना फिरून फळे व भाजीपाला विकणे शक्य होत नसल्याकारणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण शहर युथ चे अध्यक्ष सागर लोंढे यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन देऊन अशक्त व वयोवृद्ध भाजीविक्रेता ना एका जागेवर बसून व्यवसाय करण्याची सवलत द्यावी अशी मागणी केली आहे.
फलटण नगरपरिषदेला देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपालिकेने परवानगी दिली असणारे भाजी विक्रेते त्यातील काही भाजी विक्रेते हे अशक्त व वयोवृद्ध आहेत परंतु त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही अशा काही भाजी विक्रेत्यांना एका जागेवर बसून काही अंतर ठेवून त्यांना भाजी विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी.
असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फलटण शहर युथ चे सागर लोंढे यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिले आहे.