सातारा दि. 7 ( जि. मा. का ): एन.सी.सी.एस.कडून रात्री उशिरा प्राप्त 196 रिपोर्ट पैकी फलटण तालुक्यातील वडले येथील 52 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट कोरोना बाधित आला आहे, उर्वरित सगळे निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णाल, सातारा येथील 25 जणांचे नमुने तपासणीसाठी, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.