व्यायाम व खेळ ही काळाची गरज : तायाप्पा शेंडगे

 

active life style हा जीवनाचा अत्यंत  महत्त्वाचा  भाग.
 *विद्यार्थी जिवनात खेळाचे महत्व*
      
आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.
*मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांचेच शारिरिक कष्ट कमी झाले आहे.सध्याचे युग हे माहीती व तंत्रज्ञानाचे युग आहे.या युगामध्ये शारिरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक तयार करणे आज आव्हान बनले आहे.तंत्रज्ञानाशिवाय तर पर्याय नाही.*
माणुस हा बुद्धीवान प्राणी.तो आपल्या बुद्धीच्या जोरावर आजुबाजुचे वातावरण बदलतो आहे.मात्र या सर्व बदललेल्या जिवनशैलीमुळे माणसाचे शारिरिक कष्ट व शुद्ध मोकळी हवा यापासुन कोसो दुर गेला आहे.
आज सर्वच वयोगटातील व्यक्तीवर निरनिराळे ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहेत.परिणामी मानसिक,शारिरिक, भावनिक असंतुलन वाढत आहे.त्यामुळे समाजामध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
*क्रीडा आणि खेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते आम्हाला निरोगी आणि फिट ठेवतात. खेळ हे मनोरंजन आणि शारीरिक हालचालींचे एक उपयुक्त साधन आहे. क्रीडा आणि खेळ  आम्हाला ऊर्जा आणि सामर्थ्य देतात.*
 *खेळ म्हणजे मानसिक आणि शारीरिक वाढ. क्रीडा चालू असताना आपण बर्याच गोष्टी शिकू शकतो.*
आपण आशा आणि निराशा च्या midst मध्ये मानसिक संतुलन राखण्यासाठी कसे शिकायचे ते , आम्हाला कठीण परिस्थितीत कशी हाताळतात हे शिकवतात खेळ मित्रत्वाची भावना विकसित करतात. ते आपल्यात संघाची भावना विकसित करतात. ते मानसिक आणि शारीरिक कडकपणा विकसित करण्यात मदत करतात ते आपल्या शरीराला आकार देतात आणि ते मजबूत आणि सक्रिय करतात. ते आम्हाला ऊर्जा आणि सामर्थ्य देतात. ते थकवा आणि सुस्ती काढून टाकतात. ते रक्ताभिसरण सुधारतात. हे आमच्या शारीरिक कल्याण सुधारते
क्रीडा आणि खेळ आपल्या क्षमतेत सुधारणा करतात. ते आपली कार्यक्षमता सुधारतात.*
*एकतर अभ्यास किंवा काम यातून आम्हाला बाहेर टाकणे याचे कार्य करते. खेळ नसेल तर आम्ही कोणतेही काम करण्यासाठी यापुढे कार्यक्षम राहणार नाही.*
 क्रीडा आमच्या मानसिकता संपुष्टात काढून टाकतात. खेळ हे शिक्षणाचा ही अविभाज्य भाग आहेत. *खेळांशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. जीवनात त्यांचे मूल्य ठेवणे, मुलांना शाळेत अगदी सुरुवातीच्या काळात काही प्रकारचे खेळ शिकवले जातात. हे छोटे छोटे खेळ शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहेत….*
*खेळात आपला सर्वांगीण विकास होतो. आपली मानसिक तसेच शारीरिक वाढ होते. रक्ताभिसरण वाढते. ऊर्जा आणि सामर्थ्य मिळते. खिळाडू वृत्तीमुळे नवनवीन गुणांची जोपासना होते. नियमितता, एकी, संतुलन, संवेदनशीलता अशा अनेक मूल्यांची वाढ होते.*
शाळांमध्ये खेळ हा अविभाज्य भाग बनायला हवा आहे. खेळाचा विशेष तास घेतला जातोय. त्यामुळे आपली कार्यक्षमता सुधारतेय. अशाप्रकारे आपल्या जीवनात खेळाची भूमिका अतुलनीय आहे.
*वास्तविक पाहता आपले शरीर ही आपली मौलिक संपत्ती आहे.म्हणुन तिची ओळख करुन घेणे ,नियमित व्यायाम करुन घेणे ,त्याची सवय अंगी बाणने हे आपले कर्तव्य आहे.म्हणुनच शालेय जिवनापासुनच या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले नसेल तर त्याची वाढ व विकास  चांगला होत नाही.*
विद्यार्थ्याच्या अंगी असणा-या प्रचंड ऊर्जेला विविध खेळातुन जो वाव व दिशा मिळते याचा सध्या अभाव दिसतो आहे.
       विविध शारिरिक हालचालींमुळे,खेळांमुळे मुलांवरील ताणतणाव कमी होतो.
खेळ ही मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि आनंदी व तणावरहित मुले जास्त कार्यक्षम असतात.
म्हणुनच शालेय जिवनात खेळाचे महत्व अनन्यसधारण आहे.
   *लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते.म्हणुनच खेळाची आवड ही बालवयापासुनच लावली पाहिजे.*
प्राथमिक स्तरापासुन विविध खेळात तो समरस झाला पाहिजे. खेळामुळे शिस्त,जिद्द हे गुण वाढीस लागतात.परंतु आज विद्यार्थ्यांच्या वास्तविक गरजा व त्यांची आवड याकडे दुर्लक्ष होत आहे.
      विद्यार्थ्यांची एकमेव योग्यता पारखण्याचे मापदंड म्हणजे परिक्षेत मिळणारे गुण अशी परिस्थिती आज बहुतेक घरात असल्यामुळे मुलांना शाळा व क्लास,व्हिडीओगेम,बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर ,यात संगणक,मोबाइल.या सर्वांमध्ये तो मैदानी खेळ खेळणे पार विसरुनच गेला आहे.
मैदानी खेळसुद्धा मोबाइल, संगणकावरच ही मुले खेळत आहेत.
त्यामुळे शुद्ध हवा घेणे तर दुरच!
या सर्वांतुन विद्यार्थ्यांची नैसर्गिकवाढ ,विकास,अंगभुत क्षमता त्यांच्या मानसिक,भावनिक व सामाजिक गरजा लक्षात येत नाहीत.परिक्षेतील गुण म्हणजे पुढील आयुष्यात यश आणि समाधान मिळविण्याचा एकमेव मार्ग मुळीच नाही.जिवनात यश प्राप्त करायचे असेल तर वेळेचे नियोजन,समुहात काम करण्याची क्षमता,स्वत:च्या व इतरांच्या भावना समजणे,इतरांशी संवाद साधता येणे,नेतृत्वगुण असणे,ताणतणाव हाताळता येणे यासारखी अनेक जिवनकौशल्य अंगी असवी लागतात.
*ही सर्व कौशल्य मैदानावर ,समुहात खेळताना आपोआपच नकळत अंगी बाणली जातात.विकसित होतात.तसेच जिद्द,चिकाटी,मैत्री, विश्वबंधुत्वाची भावना ,खिलाडुवृत्ती यासारखे गुण मैदानावर खेळ खेळताना विकसित होत असतात.*
याबरोबरच व्यक्तीमत्व विकसित करणारे अनेक इतर सामाजिक गुण देखील विद्यार्थी नकळत आत्मसात करतात.म्हणुन शालेय जिवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
        बालवयापासुनच नियमितपणे व्यायाम व  खेळ खेळण्याची गोडी लावल्यास त्यातुनच देशात उत्कृष्ट क्रिडापटु तयार होतील.
म्हणुन शालेय वेळापत्रकातील खेळाच्या तासिका व्यायाम व खेळ घेऊन आपण उत्कृष्ट कार्य घडवुयात!
*नियमितपणे दिर्घकाळ येणारी मानसिक व शारिरिक कणखरता ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीची हक्काची संपत्ती असते.यावरुन शालेय जिवनात प्राथमिक टप्प्यावरच शारीरिक शिक्षण दररोज असणे ही विद्यमान व भविष्यकाळाची गरज आहे.आपण ” *किती जगतो यापेक्षा कसे जगतो* “
याला महत्व आहे.
       
*शालेय जिवनातच विद्यार्थ्याची शारिरिक सुदृढता व मानसिक आरोग्य विकसित झाले पाहिजे.
आरोग्यविषयक सवयीची जाण असली पाहिजे. समाजात मिळुनमिसळुन राहणे व आनंदाने उत्साहाने आपली नित्य कामे करता येणे आणि नितीमुल्यांची जोपासना करुन *जिवनभर खिलाडुवृत्तीने राहणे यासारख्या बाबींदेखील साध्य करायच्या आहेत.*
        विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी व शाळेत टिकवुन ठेवण्याची क्षमता खेळामध्ये व क्रीडा शिक्षकांमध्ये आहे.
 म्हणुन शालेय जिवनातच व्यायाम व खेळाची सवय अंगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी भोवतालच्या  परिसरात खेळल्या जाणा-या खेळांचा समावेश शाळेमधेही करण्यात यावा.
*शाळा भरण्यापुर्वी व नंतर मैदानावरील काही खेळ घ्यावेत.*
यासाठी  विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी उन्हाळी, दिवाळी सुट्ट्यांमध्ये खेळ शिबिरे घ्यावीत.
मुलांचा जास्तीत जास्त रिकामा वेळ खेळातच घालवावा.
कारण आज बहुतांशी घरात मुले खेळायचे म्हंटलं तरी त्यांना पालक परवानगी देत नाहीत. त्यांच्या अंगावर काटा येतो.
मुलांवर अभ्यासाचा ताण असतो.पालकाचा धाक असतो.म्हणुन शाळेनेच विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त खेळाच्या तासिकेत  विविध खेळाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना तणावमुक्त करुन त्यांच्या अंगी असणा-या सुप्त क्षमतांचा विकास होईल व शाळेकडुन विद्यार्थ्यांना उत्तम खेळाडु बनण्याची संधी ही आपोआपच मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
हे साध्य फक्त व्यायाम खेळ अन त्याला लाभलेला प्रेरणादायी क्रीडाशिक्षकचं करू शकतो….
*नाही तर आपली अवस्था ‘ पळशीची पी टी ‘ या पिक्चर सारखी होईल!!!*
   तायाप्पा शेडगे                       (क्रीडा प्रशिक्षक)
    फ.ए .सोसा . 
अभियांत्रिकी  महाविद्यालय , फलटण*.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!