फलटण – फुले वस्ती टाकळवाडा ता.फलटण येथे बिबट्या सदृश प्राण्यांने हल्ला केल्याने एका शेतकऱ्याच्या गाईचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आज मंगळवार दि.2 जून रोजी बिबट्या सदृश प्राण्यांने कुत्र्याचा फडशा पाडल्याने एकच खळबळ माजली असून बिबट्या सदृश प्राण्यांने टाकळवाडा व निंबळक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकळवाडा ता.फलटण येथील शेतकरी बबनराव रामचंद्र शिंदे रा.फुले वस्ती टाकळवाडा यांच्या सहा महिन्यांच्या गाईवर दि.26 मे रोजी हल्ला चढवला त्या मध्ये ती गाई दुसऱ्या दिवशी मरण पावली त्या नंतर वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून त्या प्राण्यांचा शोधाशोध केला मात्र त्याचा तपास लागला नाही. मात्र त्याच बिबट्या सदृश प्राण्यांने आज मंगळवारी दि.2 जून रोजी येथीलच एका कुत्र्यावर हल्ला चढविला व त्या मध्ये कुत्र्याला जागीच ठार केले या मुळे आज पुन्हा एकदा त्या बिबट्या सदृश प्राण्यांचे ठसे वन विभागाकडून तपासून तपास करण्यात आला आहे. या बिबट्या सदृश प्राण्यांचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणार असल्याची माहिती राजेंद्र कुंभार यांनी दिली आहे.
वन विभागाकडून याठिकाणी आढळलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्यांचे ठसे घेऊनही अद्याप हे ठसे कशाचे आहेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती वन विभागाकडून दिली गेली नसल्याने या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. पूर्व भागात लगतच नीरा नदी असून या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वेळी एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सदर प्राणी हा पिवळ्या रंगाचा,त्यावर काळे टिपके असल्याचे वर्णन केले आहे यावरुन तो बिबट्या सदृश प्राणी आहे की तरस हे आजून स्पष्ट झाले नाही.
फोटो :- 1 )बिबट्या सदृश प्राण्यांच्या हल्यात ठार झालेली गाय
2 & 3)शेतात आढळलेले बिबट्या सदृश प्राण्यांचे ठसे
4) शेतात बिबट्या सदृश प्राण्यांचे ठसे पहाताना वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ