सातारा दि. 6 (जिमाका) : सातारा जिल्हयातील एकोणीस जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा कोविड बाधित आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे वडगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यातील होळ येथील 7 व तांबवे येथील 6.
कराड तालुकयातील तुळसण येथील 5.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1.
यामध्ये 3 ते 65 वर्षे वयोगटातील अकरा पुरुष व आठ महिलांचा समावेश असुन एक जण प्रावास करुन आलेला व अठरा जण कोविड बाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत.