फलटण – येथील धैर्य टाईम्स या वृत्तपत्राची कोविड -19 अर्थात कोरोना संसर्गाच्या काळात सातत्याने उत्कृष्ट वार्तांकनची दखल घेत पुणे येथील भारतीय महाक्रांती सेना या संस्थेच्या वतीने “कोविड योद्धा ” म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.धैर्य टाईम्स या वृत्तपत्राचा 11 वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला आहे.
कोरोना हे महाभयंकर संकट देशासह जगावर आले आणि संपूर्ण जगात हाहाकार माजला. या काळात संकटाशी मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र, पोलीस,आरोग्य यंत्रना, सुरक्षा यंत्रणा यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष काम करत होते ते मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी.

फलटण तालुक्यासह सातारा, पुणे, ठाणे, व मुंबई येथील काही भागातील उत्कृष्ट वार्तांकनासह, विविध वैद्यकीय तज्ञ्, सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी, नगर पालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून कोरोना संदर्भातील महत्वाच्या घडामोडी च्या बातम्यां, लेख, निवेदने तात्काळ धैर्य टाईम्स चे न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले.
समाजाप्रती व देशसेवेप्रती केलेल्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुणे येथील भारतीय मुलक्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे व महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष ऍड. आनंदजी गुगळे यांनी धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले आहे.
या सन्मानाबद्दल अनेक मान्यवरांनी धैर्य टाईम्स वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.