पुणे(कात्रज)-जेष्ठ नाटकार व महात्मा जोतीराव फुले एक पात्री प्रयोग करणारे कुमार आहेर यांच्या मांगडेवाडी,कात्रज, पुणे येथील प्रति महात्मा जोतीराव फुले वाडा आवारात विविध प्रकारचे जांभूळ,निलगिरी,पाम, व इतर फळ, फुल झाडे असे एकूण 21 झाडे सौ. लता व नवनाथ झगडे ,सौ.सुषमा व सुनील सावंत, डॉ.प्रा.वृषाली रणधीर,कुमार आहेर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक,शिल्पकार रावसाहेब चिखलवाळे, सौ.वीणा ओव्हाळ , राहुल सरवदे,गौरव आहेर,सनी आहेर यांचे शुभहस्ते 5जुन 20 रोजी दुपारी 12 वाजता फिजिकल डिस्टन्स पाळून लावण्यात आली. कार्यक्रमाचे सुरवातीला थोरसमाज सुधारक महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धंपुतळयास सौ.लता व नवनाथ झगडे यांचे हस्ते हार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ.प्रा.वृषाली रणधीर यांनी निसर्ग समतोल राखण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या अंगणात ,आजूबाजूला झाडे लावून त्याचे नियमितपणे संगोपन केले पाहिजे असे म्हणून एक भीमगीत गायिले.
यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की कुमार आहेर यांनी 5 गुंठे मध्ये प्रति महात्मा फुले वाडा बांधून या परिसरात गरीब, गरजु मुलांच्या साठी विविध कार्यक्रम घेऊन मदत केली आहे .ते कृतिशील कार्य करीत नाटय प्रयोगातून हा वाडा बांधला हे काम केवळ फुले प्रेमी म्हणून केले असले तरी ते ऐतिहासिक कार्य केले आहे हे विसरून चालणार नाही.
यावेळी कुमार आहेर यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत शेती विषयी प्रबोधन करून सत्याचा अखंड गायीला तर सुनील सावंत यांनी भीमगीत गायिले.तर गौरव आहेर यांनी आभार मानले.