पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू होणार
बारामती:वार्ताहर पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांना सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील विविध नगरपालिका व नगरपंचायतींना 305 कोटी रुपयांच्या अंतरिम मुलभूत अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील नगरपालिकांना सुमारे साडेआठ कोटी रुपये मिळणार आहे. लोकसंख्या, क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे नॉन मिलियन प्लस सिटी या शीषर्काअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम तात्काळ वितरीत करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या निधीचा विनियोग नेमका कसा करायचा, याबाबतची कार्यपद्धती शासन स्वतंत्र आदेशाद्वारे कळविणार आहे.
पुणे जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींना प्राप्त होणारा निधी (रुपयांत) पुढीलप्रमाणे : बारामती- 1 कोटी 75 लाख, लोणावळा- 97 लाख 14 हजार, तळेगाव दाभाडे- 84 लाख 13 हजार, दौंड- 72 लाख 70 हजार, इंदापूर- 38 लाख 47 हजार, शिरुर- 55 लाख 20 हजार, जेजुरी- 23 लाख 28 हजार, भोर- 29 लाख 54 हजार, सासवड- 54 लाख 21 हजार, आळंदी- 43 लाख 41 हजार, जुन्नर- 37 लाख, राजगुरुनगर- 42 लाख 38 हजार, चाकण- 65 लाख 23 हजार, वडगाव मावळ- 26 लाख 66 हजार.