आसू – पर्यावरण रक्षण सामाजिक जबाबदारी असल्याचे लक्षात घेऊन आसू येथील तरुण युवकांनी ओसाड पडलेल्या कब्रस्तान व स्मशानभूमी मध्ये वनराई फुलवली आहे तसेच आसू ग्रामपंचायती मार्फत विविध स्तरावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन निर्जन ठिकाणी हजारो झाडांची लागवड करून मोठ्या प्रमाणात वनराई फुलवल्याचे पाहायला मिळत आहे.
फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने गावातील विविध ठिकाणी कॉलेज व शाळांच्या मार्फत वृक्षरोपणाचे विविध कार्यक्रम घेऊन हजारो झाडांची लागवड केली आहे व झाडे जगून अनेक नवीन झाडे लावून ती झाडे जगवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
आसू येथील तरुण युवकांनी निर्जन ठिकाणी झाडे लावू झाडे जगवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे स्मशानभूमी व कब्रस्तान याठिकाणी दुःखाचा सामना करण्यासाठी लोक जात असतात पण याच ठिकाणी वनराई फुलवली असता या वनराई कडे पाहून लोकांना दुःखाचा विसर पडतो. याच निर्जन स्थळाने जणू काही हिरवा शालूक परिधान केल्यास पाहायला मिळत आहे. याच हिरवळीने नटलेल्या परिसराची श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी पाहणी केली असता हा हिरवळीने फुलेला निसर्ग पाहून मनाला समाधान मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले.