जिल्ह्यातील अठरा नागरिकांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; यातील गुरसाळे येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह तर 175 निगेटिव्ह

सातारा दि. 5 (जिमाका) :  सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला  आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

बाधित रुग्णांमध्ये खटाव तालुक्यातील साठेवाडी येथील 76 वर्षीय महिला, गुरसाळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष

(मृत)

खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी धनगरवाडी 50 वर्षीय महिला

सातारा तालुक्यातील समर्थनगर, सातारा येथील 19 वर्षीय युवक, करंडी येथील 25 वर्षीय महिला

कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवती

फलटण तालुक्यातील जोरगाव येथील 25 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक व 12 वर्षांचा मुलगा, कोळकी येथील

25 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला.

जावली तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कावडी येथील 15 वर्षाचा मुलगा, 58 वर्षीय पुरुष,

 47 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक.

माण तालुक्यातील वडजल येथील 55 वर्षीय पुरुष

175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!