फलटण : कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या फलटण तालुका युवती अध्यक्षपदी आज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीपदादा ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण आजबे, संघटक श्रीकांत राजपूत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कंक, युवती प्रदेशाध्यक्षा रोशनी जैद यांच्या मार्गदर्शनाने फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील जिजाई संजय फडतरेे कृषी पदवीधर फलटण तालुका युवती अध्यक्षपदी निवड केली. जिजाई हिने कृषी महाविद्यालय धुळे येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
फलटण तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर, विद्यार्थी, युवती आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. संपूर्ण संघटना आपल्या पाठीशी आहे.असे नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननवरे यांनी प्रतिपादन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . जिजाई ही फडतरवाडी येथील प्रसिद्ध बागायतदार संजय फडतरे यांची कन्या आहे . जिजाई ही प्रसिद्ध हॉकी खेळाडू सुद्धा आहे . या निवडीबद्दल जीजाईचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे . महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तिचे अभिनंदन केले तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .